

Motorcycle passenger Catch Viral Video
Sakal
Motorcycle passenger Catch Viral Video: क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण हा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा मैदानात क्षेत्ररक्षक अफलातून क्षेत्ररक्षण करताना सर्वांचे लक्ष वेधतात. बऱ्याचदा क्षेत्ररक्षकांनी घेतलेल्या भन्नाट झेलांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण सध्या एका अशा झेलाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात रस्त्यावरून जाणाऱ्या एका बाईकस्वाराने झेल घेतल्याचे दिसत आहे.