IND vs ENG, 1st ODI: 'चित्रपट पाहात होतो आणि अचानक रोहितचा कॉल आला...' सामन्याआधी नेमकं काय घडलं? अय्यरचा खुलासा

Shreyas Iyer on Sudden Inclusion in 1st ODI: नागपूरमध्ये भारताने मिळवलेल्या वनडे विजयात श्रेयस अय्यरने मोलाची भूमिका बजावली. पण या सामन्यात त्याला खेळवणारच नव्हते, असा धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.
Shreyas Iyer | India vs England ODI
Shreyas Iyer | India vs England ODISakal
Updated on

India vs England 1st ODI: भारत विरुद्ध इंग्लंड संघाच वनडे मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये गुरुवारी (६ फेब्रुवारी) पार पडला, ज्यात भारतीय संघाने ४ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयात फलंदाजांपैकी श्रेयस अय्यर, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांनी आपली छाप पाडताना मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९ धावांवरच रोहित शर्मा (२) आणि यशस्वी जैस्वाल (१५) या सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण नंतर उपकर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सांभाळला.

Shreyas Iyer | India vs England ODI
IND vs ENG 2nd ODI: विराट कोहली दुसरी वन डे खेळणार, मग Playing XI बाहेर कोण बसणार? श्रेयस अय्यर की आणखी कोणी?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com