RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

Shubman Gill's On Facing RCB In IPL 2026 Final At Home: गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६ क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. आता गुजरातचा अंतिम सामना RCB विरुद्ध घरच्या मैदानात होईल, याबाबत शुभमन गिलने प्रतिक्रिया दिली आहे.
Shubman Gill | GT vs RR | IPL 2026

Shubman Gill | GT vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 Fine RCB vs GT Marahi News: गुजरात टायटन्सने आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. शुक्रवारी (२९ मे) मुल्लनपूरला झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात राजस्थान रॉयल्सला गुजरातने ७ विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे आता गुजरात तिसऱ्यांदा अंतिम सामना खेळेल. याबाबत गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात राजस्थानने वैभव सूर्यवंशीच्या (९६ धावा) धडाकेबाज खेळीच्या जोरावर २१४ धावा करत गुजरातसमोर २१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग गुजरातने १८.४ षटकात पूर्ण केला. गुजरातकडून साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी सलामीला १६७ धावांची भागीदारी केली. गिलने ५३ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली. तसेच साई सुदर्शनने ३२ चेंडूत ५८ धावा केल्या.

Shubman Gill | GT vs RR | IPL 2026
GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com