Gujarat Titans beat Rajasthan Royals in Qualifier 2
esakal
Gujarat Titans vs Rajasthan Royals, Qualifier 2 Marathi News: गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करत इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या अंतिम फेरीत धडक मारली. साई सुदर्शन व शुभमन गिल, या जोडीने क्वालिफायर २ मध्ये विश्वविक्रमी भागीदारी केली. वैभव सूर्यवंशीच्या ( Vaibhav Sooryavanshi) च्या ९६ धावांची वादळी खेळीवर, दोघांनी पाणी फिरवले. राजस्थान रॉयल्सच्या ६ बाद २१४ धावांचा पाठलाग करताना साई-शुभमनने पहिल्या विकेटसाठी १६७ धावांची सलामी दिली आणि GT च्या विजयाचा पाया भक्कम केला. शुभमनने विक्रमी शतक झळकावताना GT चा विजय पक्का केला. ३१ मे रोजी RCB vs GT अशी आयपीएल फायनल होणार आहे.