SMAT 2026: वैभव सूर्यवंशीचा कर्णधार म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड! पण, संघ नाही जिंकला; वाचा बिहारचा कोणी करेक्ट कार्यक्रम केला

Syed Mushtaq Ali T20 Trophy Bihar vs Saurashtra : सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ स्पर्धेत वैभव सूर्यवंशी कर्णधार म्हणून खेळत आहे. त्यामुळे त्याने विश्वविक्रमही केला. मात्र त्याच्या नेतृत्वातील बिहार संघाला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
Vaibhav Sooryavanshi | SMAT 2026

Vaibhav Sooryavanshi | SMAT 2026

Sakal

Updated on: 

SMAT 2026, Bihar vs Saurashtra: सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी २०२६ स्पर्धेत १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) बिहार संघाचे नेतृत्व करत आहे. बिहारचा पहिला सामना जयदेव उनाडकट कर्णधार असलेल्या सौराष्टविरुद्ध झाला. या सामन्याच्या नाणेफेकीसाठी वैभव मैदानात उतरताच इतिहासही घडला. तो वरिष्ठ स्तरावर टी२० क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे.

इतक्या कमी वयात टी२०मध्ये कोणत्याही पुरुष खेळाडूने इतकी मोठी जबाबदारी सांभाळली नव्हती. दरम्यान, कर्णधार म्हणून इतिहास घडवला असला, तरी कर्णधार म्हणून त्याच्यासाठी सुरुवात निराशाजनक ठरली. सौराष्ट्रने बिहारला २१ चेंडू आणि ५ विकेट्स राखून पराभूत केलं.

Vaibhav Sooryavanshi | SMAT 2026
Syed Mushtaq Ali Trophy: मोठा उलटफेर! पाँडिचेरीने दिला पृथ्वी शॉच्या महाराष्ट्राच्या संघाला पराभवाचा धक्का
Loading content, please wait...