

Virat Kohli - MS Dhoni
Sakal
इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर म्हणजेच दोन सामने होत आहेत. दुसरा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
साखळी फेरीत या दोन संघात होणारा हा एकमेव सामना आहे. यानंतर हे दोन संघ साखळी फेरीत आमने-सामने येणार नाहीत. कारण हे दोन संघ वेगवेगळ्या गटात असल्याने त्यांच्यात एकच सामना होणार असून हा बंगळुरूच्या घरच्या मैदानात होणार आहे.