हार्दिक पांड्या संघात परतणार? दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर मुंबईसाठी मोठी गूड न्यूज; राजस्थानविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी काय आहे तयारी?

Hardik Pandya: दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला. समीर रिझवीच्या दमदार खेळीमुळे सामना एकतर्फी झाला, तर पुढील सामन्यासाठी हार्दिक पांड्या परतणार असल्याने मुंबईला दिलासा मिळाला.
Hardik Pandya

Hardik Pandya

esakal

Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी या हंगामाचा पहिला डबल हेडर खेळवला गेला. काल दुपारी दोन सामने झाले. पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगला. हा आयपीएल २०२६ मधला ८ वा सामना होता, जो दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळवला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या याला बरं नसल्याने तो या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. त्यामुळे सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले. परंतु आता मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com