Animal Ranbir Kapoor : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' मुळे शीख बांधव नाराज, काय आहे कारण?

प्रसिध्द दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल या चित्रपटानं एव्हाना प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे.
Ranbir Kapoor Animal Movie Controversy Punjab Sikh organizations
Ranbir Kapoor Animal Movie Controversy Punjab Sikh organizations

Ranbir Kapoor Animal Movie Controversy Punjab Sikh organizations : प्रसिध्द दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल या चित्रपटानं एव्हाना प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. अशावेळी एका घटनेनं या चित्रपटावरुन वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. ते प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

रणबीर कपूरच्या अॅनिमलनं प्रचंड लोकप्रियता मिळवली असली तरी त्यावर होणाऱ्या टीकेचा वर्षावही काही कमी नाही. भलेही त्यानं तीनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली असेल मात्र त्यातील हिंसकता, क्रौर्य आणि दृष्य यामुळे त्याच्याभोवतीचा वाद आणखी तीव्र होताना दिसून येतो आहे. या सगळयात शीख बांधवांच्या भावना दुखावल्याचे बोलले जात आहे. ऑल इंडिया शीख स्टुडेंड फेडरेशनच्या वतीनं अॅनिमलवर आक्षेप घेण्यात आला आहे Ranbir Kapoor Animal Movie Controversy Punjab Sikh organizations

फेडरेशनचे अध्यक्ष करनल सिंह पीर मोहम्मद यांनी सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी त्या चित्रपटातील वादग्रस्त सीन हटविण्याची मागणी केली आहे. अॅनिमलमधून शीख धर्माचा अपमान करण्यात आल्याचे फेडरेशनच्या वतीनं त्या पत्रात म्हटले आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर आणि शक्ती कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अॅनिमलनं चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली आहे.

अॅनिमलमधील काही प्रसंगावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. अनेकांनी या चित्रपटाला महिलांचा अपमान करणारा चित्रपट असे म्हटले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेडरेशनचे म्हणणे आहे की, त्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर हा एका गुरशिख यांच्याकडे पाहून धुम्रपान करतो आणि तो धूर त्यांच्या चेहऱ्यावर सोडतो. दुसऱ्या एका सीनमध्ये तो एका गुरुशीख बांधवाच्या दाढीवर चाकू ठेवल्याचे दिसते.

करनल यांचे म्हणणे आहे की, अॅनिमलमधील या प्रसंगावर आमचा आक्षेप आहे. चित्रपटामध्ये अर्जन वेल्ली यांच्या गाण्यावर देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, श्री गुरु गोविंद सिंह यांच्या द्वारे तयार करण्यात आलेल्या गाण्याचा उपयोग हा राडेबाजी आणि गुन्हेगारी दाखविण्यासाठी करण्यात आला आहे.

सेन्सॉर बोर्डानं त्या प्रसंगावर आक्षेप घ्यावा आणि ते सीन चित्रपटातून काढून टाकावेत. जेणेकरुन लोकांवर त्याचा वाईट परिणाम होता कामा नये. अशी मागणी फेडरेशनच्या वतीनं बोर्डाकडे करण्यात आली आहे.

Ranbir Kapoor Animal Movie Controversy Punjab Sikh organizations
Viral Video: एक वर अन् चार वधू... अनोख्या लग्नाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; काय आहे हा प्रकार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com