

FDA Tukaram Mundhe
ESakal
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील सहा उपाहारगृहे, हॉटेल, बेकरी आणि क्लब यांचे अत्र व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत ३१ ठिकाणी छापे मारून ३४ लाख ८७ हजार ६०३ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व इतर अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, वितरण व वाहतूक करणाऱ्या १९ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत एका आस्थापनेला सील करून तीन वाहने जप्त करण्यात आली.