Why Raj Thackeray Demanded Cancellation of SIR
esakal
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह SIR प्रक्रियेच्या विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत दोन प्रमुख मागण्या केल्या. महाराष्ट्रात आतापर्यंत झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करावी आणि यापुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.