हळूहळू चालवा गाडी : नववर्षात वाढले अपघात 

road accident growth
road accident growth
Updated on

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक कोंडीवर तोडगा निघाला. मात्र, वाहनांचा वाढलेला वेग अन्‌ बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक नियमांचे नसलेल्या गांभीर्यामुळे जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दिड महिन्यात चार हजार अपघातात एक हजार 967 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 29 लाख बेशिस्त वाहनचालकांकडून सर्वाधिक 67 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


राज्यात दरवर्षी सरासरी 30 हजार रस्ते अपघातात तब्बल 22 हजार जणांचा मृत्यू होत असल्याची नोंद राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडे झाली आहे. दुसरीकडे दरवर्षी सरासरी एक कोटी 25 लाख वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांच्याकडून सरासरी 225 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. तरीही वाहन चालक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याचे चित्र यंदाही जैसे थे आहे. त्यामध्ये नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, बुलढाणा, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. वाहतूक नियंमाचे पालन करा, दुचाकीस्वारांनी सुरक्षितता म्हणून हेल्मेट वापरावे, सिटबेल्टचा वापर करावा, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा माल वाहतूक करु नये, विनापरवाना अथवा कमी वयातील मुलांना वाहन चालवायला देवू नका, असे आवाहन आरटीओ व शहर वाहतूक पोलिसांनी करुनही बेशिस्त वाहतूक सुरुच आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार मागील दिड महिन्यात सर्वाधिक अपघात व मृत्यू झाले असून दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक असल्याचे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. 


राज्याची स्थिती (जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत) 
अपघात 
3,949 
मृत्यू 
1,967 
बेशिस्त वाहनचालक 
28,09,216 
दंड 
66.89 कोटी 


'आरटीओ'च्या रिक्‍त पदांमध्ये वाढ 
सोलापूर, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूरसह बहूतांश जिल्ह्यांमधील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये वाहन निरीक्षक व सहायक वाहन निरीक्षकांची 40 टक्‍क्‍यांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हेल्मेटसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी, असे निर्देश दिले, मात्र रिक्‍त पदांमुळे त्यात सातत्य राहिलेले नाही. सोलापूर उपप्रादेशिक परिवहनकडे दोन वाहन निरीक्षक असून तब्बल 32 पदे रिक्‍त आहेत. त्यामुळे कारवाई करताना अडथळे येत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

A Legacy of Four Decades: Wrestling Tradition Alive in Mangalwedha
Wari Festival Update: Authorities Propose Exemption to Continue Ashadhi Wari Arrangements Smoothly
Action under MPDA
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com