India sugar price hike due to production decline
esakal
सांगली : राज्यात साखरेच्या दराने पुन्हा उच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या महिनाभरात घाऊक बाजारात प्रति क्विंटल सुमारे ४०० ते ४५० रुपयांची, तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६ ते ७ रुपयांची वाढ झाली (Retail sugar rates in Maharashtra) आहे. त्यामुळे मोठ्या साखरेचा किरकोळ दर ४९ ते ५१ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला असून, याचा परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती अर्थसंकल्पावर होत आहे.