

Shaktipeeth Highway Survey Bhudargad Farmers Protest
esakal
Shaktipeeth Highway Mapping : शक्तीपीठ महामार्गाच्या मॅपिंगला भुदरगड तालुक्यातील म्हसवे येथे शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. मंगळवारी (ता. २४) पहाटे पाचच्या सुमारास मॅपिंगचे काम सुरू होताच संतप्त शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत प्रशासनाच्या पथकाला विरोध केला. यावेळी संतप्त गावकऱ्यांनी मॅपिंगसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची, तसेच काही वाहने आणि मॅपिंगच्या यंत्रांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गावात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.