Nana Patekar: ‘तुम्ही खचू नका, एक फोन करा...’ १९७ महिलांच्या अश्रूंना आधार देणारे नाना सोलापूरकरांना पोरके करून गेले

Nana Patekar Remembered by 197 Farmer Widows in Solapur: १९७ महिलांना दिला जगण्याचा आधार; नाना पाटेकरांच्या आठवणीने सोलापूरकर गहिवरले
Nana Patekar News Solapur Farmers Remember His Support for 197 Widows and His Unfulfilled Plan to Help Farmer Suicide Victim Families

Nana Patekar News Solapur Farmers Remember His Support for 197 Widows and His Unfulfilled Plan to Help Farmer Suicide Victim Families

sakal

Updated on: 

सोलापूर : रंगभवनात समोर बसलेल्या त्या १९७ महिलांच्या डोळ्यांत अश्रू होते. संसाराचा आधार असलेला शेतकरी पती आत्महत्येने हिरावला होता. कुशीत लहान मुले होती आणि पुढचे आयुष्य कसे जगायचे, हा प्रश्न होता. त्या दिवशी नाना पाटेकर त्यांच्यासमोर उभे राहिले. अभिनेता म्हणून नव्हे, तर आधार देणारा आपला माणूस म्हणून. “तुम्ही खचू नका, एक फोन करा... लढा, पडू नका,” या शब्दांनी त्यांनी त्या महिलांच्या अश्रूंना हात दिला. दहा वर्षांनी पुन्हा त्याच सोलापुरातून मदतीची सुरुवात करण्याचे नानांचे स्वप्न होते; पण त्या स्वप्नाला सुरुवात होण्याआधीच नाना निघून गेले. आसवे पुसणाऱ्या त्या माणसाच्या जाण्याने आज सोलापूरकरांच्या डोळ्यांतच आसवे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com