Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून खानापूर शेतकरी पोलिसांत जोरदार झटापट; पोलिसांनी काठी हातात घेताच शेतकऱ्यांनी दगडे घेतली...

Shaktipeeth Highway Land Survey : शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीवरून खानापूरमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी काठ्या हातात घेतल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दगडे उचलल्याने परिसरात तणाव निर्माण झाला.
Shaktipeeth Expressway Land Survey

Shaktipeeth Expressway Land Survey

esakal

Updated on: 

Shaktipeeth Highway Farmers Protest : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीवरून खानापूर तालुक्यात संघर्षाचा भडका उडाला आहे. नेवरी आणि भाळवणी परिसरात जमीन मोजणीसाठी आलेल्या प्रशासनाच्या पथकाला संतप्त शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. संतप्त शेतकऱ्यांनी हातात दगड घेतल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली, तर महिला शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेत मोजणीला विरोध केला.

Loading content, please wait...