

Historic Move: MSRTC Launches Its First-Ever Tourism Package from Pune
Sakal
अविनाश ढगे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी ः महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन योजने’अंतर्गत प्रथमच खासगी पर्यटन कंपन्यांप्रमाणे ‘टूर पॅकेज’ ठरवले आहे. याचा श्रीगणेशा पुण्यातून केला असून, संकष्टी चतुर्थीनिमित्त शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगारातून चार एप्रिल रोजी ‘अष्टविनायक दर्शन’ बस सोडण्यात येणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे.