

Summer road trip preparation India
esakal
अरविंद रेणापूरकर - arvindrenapurkar@gmail.com
उन्हाळी पर्यटन आजच्या आधुनिक वाहनांमुळे अधिक आरामदायी आणि सुखकर झाले आहे. महाराष्ट्रापुरतेच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःची गाडी घेऊन फिरण्याची हौस अनेकांना असते. रस्त्यांवर दिसणाऱ्या वाहनांच्या रांगा हीच गोष्ट अधोरेखित करतात. परंतु, उन्हाळ्यात अशी भटकंती करताना काही बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. योग्य नियोजन, सुरक्षितता आणि शरीराची काळजी या गोष्टींची जोड असेल, तरच खऱ्या अर्थाने ‘व्हेकेशन ऑन व्हील्स’ अविस्मरणीय ठरते.
दमदार इंजिन, आरामदायी आसनव्यवस्था आणि प्रगत सुरक्षितता यांचा संगम असेल, तर भटकंतीला खऱ्या अर्थाने ‘चार चाँद’ लागतात. वाहन उद्योग प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने नवे तंत्रज्ञान आणि फीचर्स आणत आहे. रेंज रोव्हर, टाटा हॅरियर किंवा रॉयल एनफिल्ड यांच्या नव्या मॉडेलकडे पाहिल्यास कम्फर्ट आणि लाँग-ड्राइव्हसाठी उपयुक्त वैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात. मात्र, भर उन्हाळ्यात प्रवास करताना काही मूलभूत गोष्टींचा विचार करणे तितकेच आवश्यक ठरते.