

India Nepal Relations: Political Satire on Diplomacy, Friendship and Bilateral Ties
esakal
नेपाळ ही आमची अत्यंत आवडती देवभूमी आहे. गुदस्तसाली तेथे युवाक्रांती झाली. या क्रांतीच्या ठिणग्यांमुळे लागलेल्या जागृतीच्या आगीत हुकूमशाही राजवट भक्षस्थानी पडली. के छ? (अर्थ : काय म्हणता?) नेपाळभूमीत एव्हरेस्ट नावाचे एक हिमशिखर असून ते जगातले सर्वांत उंच शिखर आहे, असे आम्ही भूगोलाच्या बुकात वाचल्यासारखे आठवते. आम्ही काही तिथे (कडमडायला) गेलेलो नाही. -पण आता जाऊ!! कारण नेपाळशी भारताचे संबंध अधिक सुमधुर झाले आहेत. इतके की भारतातून आलेल्या पर्यटकांसाठी एव्हरेस्टची उंची थोडी कमी करण्याची तयारीही नेपाळी बांधवांनी दाखवल्याचे कळते. मनकारी नेपाली, दमदार नेपाली!