Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

Eknath Shinde on Rahul Gandhi protest : दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पंतप्रधान निवासस्थानासमोर झालेल्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर बेजबाबदारपणाचा आरोप करत राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित केला.
Eknath Shinde on Rahul Gandhi protest

Eknath Shinde on Rahul Gandhi protest

esakal

Updated on

-अर्चना पवार

कास (जि. सातारा) : विरोधी पक्षनेत्या सारख्या जबाबदार पदावर असलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान यांच्या निवासस्थानासमोर केलेलं आंदोलन अत्यंत बेजबाबदारपणाचे असून ज्या ठिकाणी आंदोलन करू शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही जाता आणि लोकांना इकडे या बोलता म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं, प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता का? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशांमध्ये अराजकता पसरवायची आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे येथे दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या प्रश्नावर केला. (Delhi student protest latest news)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com