

Satara Street Light Issue 57 Lights Remain Nonfunctional Amid Electricity Bill Dispute and Neglect by Local Representatives
sakal
सातारा : बाँबे रेस्टॉरंट चौक ते संगममाहुली या मुख्य मार्गावर लाखो रुपये खर्च करून उभारलेले ५७ स्ट्रीट लाइट बंद आहेत. या खांबावरील दिव्यांचे वीजबिल कोणी भरायचे? यावरून दिवे बंद असल्याचे समोर आले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्राथमिक सुविधा असलेली वीज देखील मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.