

Sugar Price Hike
esakal
नाशिक: श्रावण महिना सुरू होताच सणांची रेलचेल सुरू होते. सणवार सुरू झाल्यावर मिठाई खरेदीचे प्रमाण वाढते. ३५ ते ४० रुपये किलोप्रमाणे मिळणारी साखर थेट ७८ रुपयांपर्यंत पोचल्याने मिठाईच्या किमतीत २० ते ४० टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर दूध ९० रुपये लिटर झाले. तेल, तुपाच्या किमतीत वाढ झाल्याने येत्या ऐन सणासुदीच्या काळात मिठाईचा गोडवा हरवणार आहे.