

Citizens, Women and Children Join Peaceful Rally in Pali Supporting Student Protest
esakal
-अमित गवळे
पाली: दिल्लीतील जंतर मंतर येथे न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे तीव्र पडसाद रायगड जिल्ह्यातील पाली-सुधागडमध्ये उमटले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (ता.22) सायंकाळी पाली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ संपूर्ण सुधागडवासीय एकवटले.