रत्नागिरी : नाणीजमध्ये उद्या नरेंद्राचार्य महाराज जन्मोत्सव 

Narendra Maharaj Birth Celebration Tomorrow in Nanij
Narendra Maharaj Birth Celebration Tomorrow in Nanij

रत्नागिरी - अखिल भारतीय षड्‌दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, अखिल भारतीय श्री पंच निर्वाणी आखाड्याचे धर्मदास महाराज व अन्य संत-महंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. 31) जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा होत आहे. श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील सुंदरगडावर त्याची सुरुवात झाली. याग व निमंत्रण मिरवणुकांना नाणीज येथे आरंभ झाला. लाखो भाविक दाखल झाले आहेत. 

बुधवारी (ता. 30) सकाळी 9 वाजता श्री सूर्य पंचायतन याग व अन्नदान विधी सुरू झाला. त्यानंतर सकाळी 10पासून स्वामीजींचा दीर्घायुष्य महाभिषेक विधी सुरू होईल. या सोहळ्याचे निमंत्रण देवदेवतांना देणाऱ्या मिरवणुका सकाळी उत्साहात सुरु झाल्या.

सायंकाळी 5 वाजता दीर्घायुष्य महाभिषेक विधीची सांगता तर गुरुवारी सकाळी 10 वाजता चरण दर्शन, पालखी परिक्रमा सोहळा व स्वामीजींचा दीर्घायुष्य महाभिषेक विधी होतील. दुपारी 1 ते 1.30 श्री सूर्य पंचायतन याग सुरु होईल. सकाळी 10 व दुपारी 3 वाजता चरण दर्शन सोहळा सुरू होईल. सायंकाळी पदवीदान कार्यक्रम होईल.

कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन

7.30 ते 8.30 वाजता संस्थानचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. त्यानंतर जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचे अमृतमय प्रवचन होईल. 9.30 वाजता जगद्‌गुरू श्रींची तुलशीपत्र तुला होईल. रात्री 10 वाजता जगद्‌गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा होईल. येथील सद्‌गुरू काडसिद्धेश्‍वर महाराज हॉस्पिटलमध्ये आज सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. 

राज्यात 57,741 बाटल्या रक्त संकलित 

नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त अनेक सेवाभावी उपक्रम राबविले जातात. यंदाही जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रासह अन्य राज्यांत 25 दिवस रक्तदान यज्ञ झाला. त्यात एकूण 727 शिबिरात विक्रमी 61007 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. महाराष्ट्रात 57,741 बाटल्या रक्त संकलित झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com