पाहा दिपोत्सवाने उजळलेले कुणकेश्वरचे मंदीर (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

दिपावली पाडव्याचे औचित्य साधून मंदिर आणि परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील गाभाऱ्यात तालुक्‍यातील वरेरी येथील ज्येष्ठ आंबा बागायतदार आणि उद्योजक विनायक पारकर यांच्या हस्ते दिपोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला.

देवगड - तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरात दिपावली वार्षिक उत्सवानिमित्त पाडव्याला (ता.28) रात्री मंदिरासह परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता. सोमवार असल्याने यावेळी विविध ठिकाणच्या भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे दहा हजार पणत्या प्रज्वलीत केल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर पेडणेकर यांनी दिली. दरम्यान, मंदिरात सुगम संगीताचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. 

दिपावली पाडव्याचे औचित्य साधून मंदिर आणि परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील गाभाऱ्यात तालुक्‍यातील वरेरी येथील ज्येष्ठ आंबा बागायतदार आणि उद्योजक विनायक पारकर यांच्या हस्ते दिपोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. श्री देव कुणकेश्‍वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्‍वर विश्‍वस्त मंडळ, देवस्थानचे देवसेवक - मानकरी तसेच विविध मान्यवर, भाविक भक्‍तांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

सिंधुदुर्गात प्रथमच या प्राण्याच्या कळपाचा हल्ला 

विनायक पारकर यांचा ट्रस्टच्यावतीने सन्मान करण्यात आला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष किशोर पेडणेकर, सचिव बाळकृष्ण मुणगेकर, चंद्रशेखर बोंडाळे, संजय वाळके, पुंडलिक नाणेरकर, अरविंद वाळके, शैलेश बोंडाळे, प्रदीप मुणगेकर, व्यवस्थापक रामदास तेजम, सरपंच श्रुती बोंडाळे, आंबा बागायतदार रूपेश पारकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करण्यात आले. सोमवार असल्याने भक्‍तांच्या उत्साहाला उधाण आले होते. 

अशी असते मेंढरे पळविण्याची आगळीवेगळी स्पर्धा... (व्हिडिओ)

अनेकांचे हात एकाचवेळी जुडले... 

मंदिरातील गर्भागृह, ध्यानगृह, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर परिसरात बहुसंख्य दिप उजळण्यात आले होते. यासाठी अनेकांचे हात एकाचवेळी जुडले आणि बघताबघता मंदिर परिसर पणत्यांच्या प्रकाशात लख्ख उजळून निघाले. या उत्सवा दरम्यान आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळीचे आकर्षक कलात्मक नमुने पहावयास मिळाले. परिसरात विविध रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. आकाशाला गवसणी घालणाऱ्या फटाक्‍यांनी अवकाशांत रंग भरल्याने वातावरण अधिकच मोहक बनले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipoushav in Kunkeshwar Temple in Sindhudurg

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: