Mumbai heavy rainfall weather update
esakal
IMD Maharashtra rain alert July 2026 : राज्यातील विविध भागांसह मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी (ता. 3 जुलै) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.