

Maharashtra Rain Update
ESakal
केरळच्या दिशेने वेगाने सरकत असतानाच रविवारी सकाळी रत्नागिरी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. ढगांच्या कडकडाटांसह पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना थोडासा दिलासा मिळाला. या पावसाचा अंतिम टप्प्यातील हापूस आंब्याला फटका बसला आहे. काढण्यायोग्य असलेला आंबा अनेक ठिकाणी गळून गेला असून कॅनिंगसह आंबा पेटीचे दर कमी होणार आहेत.