Maharashtra Politics | आसामहून 'बॉड्या' आणणार म्हणणाऱ्या राऊतांनी फिरवले शब्द; ट्वीट चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut
आसामहून 'बॉड्या' आणणार म्हणणाऱ्या राऊतांची सारवासारव; ट्वीट चर्चेत

आसामहून 'बॉड्या' आणणार म्हणणाऱ्या राऊतांनी फिरवले शब्द; ट्वीट चर्चेत

एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांनी बंड केलं आणि गुवाहाटीत आपला मुक्काम हलवला. त्यानंतर शिवसेना (Shivsena) चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने या बंडखोरांवर वादग्रस्त शब्दांत टीका करत आहेत. अशातच आता त्यांचं नवं ट्वीट चर्चेत आलेलं आहे. (Sanjay Raut News)

हेही वाचा: "भाजपाचं धोतर सुटलं"; 'सामना'तून बंडखोरांचा 'नाच्या' असा उल्लेख

जहालत एक किस्म की मौत है और जाहिल लोग चलती फिरती लाशें है, असं संजय राऊत आपल्या या ट्वीटमध्ये म्हणतायत. या ट्वीटचा संदर्भ कळण्यासाठी याची पार्श्वभूमी जाणून घ्यायला हवी. काही दिवसांपूर्वी बंडखोरांबद्दल संजय राऊतांनी (Sanjay Raut) वादग्रस्त विधान केलं होतं. आसाममधून आपण ४० 'बॉड्या' (मृतदेह) परत आणणार, असं विधान त्यांनी केलं होतं. तसंच आसाममधल्या कामाख्या देवीला रेड्याचा बळी द्यावा लागतो. आम्ही तिकडे ४० रेडे पाठवलेत, असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा: 'जय महाराष्ट्र' म्हणत संजय राऊतांचं ट्वीट; शेअर केला व्हिडीओ

संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वादग्रस्त विधानांचं सत्र सुरूच आहे. आता शिवसेनेतल्या बंडखोरांवर तीव्र टीका केली जात आहे. काल सामनामधूनही बंडखोर आमदारांवर टीका करण्यात आली होती. एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) उल्लेख एकदास शिंदे, तर बंडखोर आमदारांचा उल्लेख नाच्या असा करण्यात आला होता.

Web Title: Sanjay Raut Assam Guwahati Eknath Shinde Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top