'जय महाराष्ट्र' म्हणत संजय राऊतांचं ट्वीट; शेअर केला व्हिडीओ

शिवसेनेतले जवळपास सगळे मंत्री आता शिंदे गटात गेले असून मंत्र्यांपैकी फक्त आदित्य ठाकरे आता शिवसेनेत राहिलेत.
Sanjay Raut Tweet | Sanjay Raut Shared Video of Gulabrao Patil
Sanjay Raut Tweet | Sanjay Raut Shared Video of Gulabrao PatilSakal
Updated on

शिवसेनेत आत्तापर्यंतचं ऐतिहासिक बंड झालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी हे बंड पुकारलं असून शिवसेनेचे जवळपास सगळे मंत्री बंडात सामील झाले आहेत. आता फक्त आदित्य ठाकरेच राहिले आहेत. अशातच संजय राऊतांनी ट्वीट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Sanjay Raut Shared Video of Gulabrao Patil)

आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ शेअऱ केला आहे. शिवसेनेत पुंगाणी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दीपकराव भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणारा गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) तुमच्यासमोर मंत्री म्हणून बोलतोय, अरे हे सोडा, सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले. असं या शिवसेनेचं आहे. रतनिया कहीं साप बदल लेते है, पुण्य की आड मे पाप बदल लेते है, मतलब के लिए कई लोग बाप बदल लेते हैं!, असं गुलाबराव पाटील या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. (Sanjay Raut Tweet)

हा व्हिडीओ शेअर करताना संजय राऊतांनी म्हटलं आहे की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय आहे पहा. श्रीमान केसरकर, थोडा संयम ठेवा. डोंगर, झाडी, निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना? जय महाराष्ट्र!

Sanjay Raut Tweet | Sanjay Raut Shared Video of Gulabrao Patil
"भाजपाचं धोतर सुटलं"; 'सामना'तून बंडखोरांचा 'नाच्या' असा उल्लेख

दरम्यान, संजय ऱाऊतांनी सामनातून एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर जहरी टीका केलेली आहे. बंडखोर आमदारांचा उल्लेख त्यांनी नाच्या असा केला आहे. तसंच केंद्र सरकारने या आमदारांना दिलेल्या सुरक्षेवरुन केंद्रावरही टीका केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com