परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट केले आहे की, "अधिकृत भेटीसाठी नवी दिल्लीत आगमन झालेले लक्झेंबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री झेवियर बेटेल यांचे हार्दिक स्वागत. ही भेट भारत आणि लक्झेंबर्ग यांच्यातील बहुआयामी संबंध अधिक दृढ करण्याची संधी उपलब्ध करून देते." असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.