Ketki Chitale: केतकी पुन्हा आली! फेसबूक 'ॲक्सिस' मिळाला

टीव्ही मनोरंजन विश्वातील अभिनेत्री केतकी चितळेनं फेसबूकवर एक पोस्ट शेयर करुन आपण पुन्हा एकदा त्या माध्यमावर सक्रिय झाल्याचे सांगितले आहे.
Actress Ketki Chitale  news
Actress Ketki Chitale news esakal

Ketki Chitale News: टीव्ही मनोरंजन विश्वातील अभिनेत्री केतकी चितळेनं फेसबूकवर एक पोस्ट शेयर करुन आपण पुन्हा एकदा त्या माध्यमावर सक्रिय झाल्याचे सांगितले आहे. आपल्या वादग्रस्त प्रतिक्रियेसाठी आणि परखड (Tv entertainment News) भूमिकेसाठी ओळखल्या जाणारी केतकी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. आपल्याला काय वाटते हे जास्त महत्वाचे, त्यासाठी कुणाचा कितीही विरोध असला तरी तो मान्य अशा भूमिकेतून स्वताची मतं मांडणाऱ्या केतकीनं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याविषयीची आक्षेपार्ह पोस्ट शेयर केली होती. त्यामुळे तिच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. यापूर्वी देखील तिनं अशाप्रकारे वादग्रस्त पोस्ट शेयर करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

केतकीनं आता एक नवी पोस्ट शेयर केली होती. त्यामध्ये तिनं म्हटलं आहे की, मला फायनली माझं फेसबूक अॅक्सेस मिळालं आहे. सध्याच्या घडीला का होईना ते पुन्हा मिळालं आहे याचं समाधान आहे. असं केतकीनं म्हटलं आहे. काही तासांपूर्वी शेयर केलेल्या त्या पोस्टला शेकडो कमेंट मिळाल्या आहेत. त्यात अनेकांनी केतकीचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी केतकीला काळजी घेण्यास सांगितले आहे. आपल्या परखड स्वभावामुळे अनेकांचा राग ओढावून घेणाऱ्या केतकीच्या पोस्टमुळे वादंग निर्माण झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे तिच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पवार यांच्यावरील टीकेनं केतकीवर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

Actress Ketki Chitale  news
Ketki Chitale: केतकीच्या विरोधातील 22 तक्रारींची एकत्रित FIR - हायकोर्ट

कोर्टामध्ये देखील केतकीनं आपली भूमिका काही सोडली नाही. आपल्याला जे योग्य वाटले तेच केले असं तिनं सांगितलं होतं. त्यामुळे आता केतकीला फेसबूकचं लॉग इन पुन्हा मिळाल्यानंतर तिच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष आहे. वादग्रस्त आणि वातावरण दुषित होईल असं काही पोस्ट करणाऱ्या केतकीच्या सोशल मीडियावर सायबरचाही वॉच असेल अशी चर्चा आहे. केतकी सध्या जामीनावर बाहेर असून तिच्यावर पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट शेयर केल्याप्रकरणीचा आरोप आहे. ते प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे.

Actress Ketki Chitale  news
Ketki Chitale: 'जुबेरला वेगळा आणि मला वेगळा न्याय का? केतकी चितळेचा प्रश्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com