Ketki Chitale: केतकीच्या विरोधातील 22 तक्रारींची एकत्रित FIR - हायकोर्ट | Ketki chital Bombay HighCourt clubs all 22 FIRs against Marathi Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ketki Chitale news

Ketki Chitale: केतकीच्या विरोधातील 22 तक्रारींची एकत्रित FIR - हायकोर्ट

Ketki Chitale: देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या केतकीच्या विरोधात मुंबई (Bombay High Court) उच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. तिच्याविरोधात राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ज्या 22 गुन्ह्यांची एकत्रित नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे. केतकीच्या विरोधात 22 तक्रारी दाखल झाल्या होत्या. तर विद्यार्थी निखिल भाम्रेच्या विरोधात सहा तक्रारी होत्या. त्यांना मे मध्ये मुंबई पोलिसांनी अटकही केली होती. सोशल मीडियावर पवार यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी त्यांनी केली होती.

केतकीच्या त्या पोस्टनंतर तिच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. कोर्टातही केतकीचा उद्दामपणा दिसून आला होता. तिनं आपण सोशल मीडियावर पोस्ट करुन कोणताही गुन्हा केल्याचे म्हटले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यच्या नावाखाली आपण आपल्याला जे वाटते ते म्हटले. ती पोस्ट आपली नसून दुसऱ्या कुणाची आहे. ती फक्त शेयर केली. असे केतकीचे म्हणणे होते. त्यामुळे केतकीवर गुन्हा दाखल झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील केतकीवर सडकून टीका केली होती. सध्या केतकीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. परंतु केतकीला जेव्हा अटक झाली तेव्हा काही अज्ञात लोकांनी केतकीवर शाइफेक केली होती. या घटनेला काही महीने उलटल्यानंतर केतकीने त्या शाइफेकीला सडेतोड उत्तर दिलं आहे.

अभिनेत्री केतकी चितळे गेली काही वर्षे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात आहे. कधी निर्मात्यांशी वाद, कधी शेजऱ्यांशी तर कधी राजकीय विधाने. मध्यंतरी तिने एक कविता पोस्ट करून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारी, व्यंग करणारी कविता पोस्ट केली होती. बघता बघता हे प्रकरण इतकं चिघळलं की केतकीला अटक करण्यात आली. यावेळी संतप्त जमावातील काही लोकांनी तिच्यावर शाइफेक केली. तेव्हा केतकीच्या ब्लाऊजवर ही शाई सांडली होती. त्याच आठवणी आणि तो ब्लाऊज घेऊन केतकीने यावर उत्तर दिलं आहे. एक व्हिडिओच्या माध्यमातून ती बोलती झाली आहे.

हेही वाचा: Movie Clip Viral : कपिल शर्माच्या चित्रपटाची क्लिप व्हायरल; दिसला गंभीर भूमिकेत

आपल्यावर टीका करणाऱ्यांना केतकीनं जशास तसे उत्तर दिले आहे. शाइफेक करणाऱ्यांना अत्यंत मार्मिकपणे तिने आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. या व्हिडिओला तिने 'हर हर महादेव' असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. आता केतकीच्या विरोधातील तक्रार ही ठाणे पोलीस तर भाम्रेच्या विरोधातील तक्रार नवपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. केतकीच्या प्रकरणातील पुढील सुनावणी ही सहा सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: Laal Singh Chaddha: 'मैंने कहा था एक दिन मैं हसूंगा तुम रोओगे!' चतूरच्या मीम्सचा कहर

Web Title: Ketki Chital Bombay Highcourt Clubs All 22 Firs Against Marathi Actress 6 Fir Against Nikhil Bhamre

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..