
Ketki Chitale: 'जुबेरला वेगळा आणि मला वेगळा न्याय का? केतकी चितळेचा प्रश्न
Mohammad Zubair: उत्तर प्रदेशातील उच्च न्यायालयानं मोहम्मद जुबेरच्या अटकेचे आदेश दिले होते. त्यानंतर जुबेरनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं जुबेरला अंतरिम जामीन दिला आहे. यावरुन आता वेगळ्याच चर्चेला तोंड फुटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे तर काहींनी त्यावरुन प्रतिक्रियाही दिली आहे. यासगळ्यात मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळेनं पुन्हा एकदा परखड प्रतिक्रिया दिली आहे. जर जुबेरला कोर्टाकडून न्याय मिळु शकतो तर मला का नाही असा प्रश्न केतकीनं उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट केतकीनं केली होती. त्यामुळे तिच्यावर सायबर शाखेनं गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर केतकीवर राज्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते एका पोलीस ठाण्यात वर्ग करुन एकत्रितपणे केस सुरु होती. यावेळी केतकीला कोर्टात हजर केल्यानंतर देखील तिनं आपण कोणत्याही प्रकारे चूक केली नसल्याचे सांगून आणखी नेटकऱ्यांचा राग ओढावून घेतला आहे. दरम्यान केतकीची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
जुबेरच्या सुनावणीनंतर बॉलीवूडची अभिनेत्री स्वरानं देखील कोर्टाला धन्यवाद दिले होते. त्यामुळे तिला देखील नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. केतकीनं आता सोशल मीडियावरुन जी पोस्ट केली आहे त्यात तिनं लिहिलं आहे की, आता जुबेरला जो न्याय मिळाला आहे तो मला का मिळाला नाही, त्याला वेगळा आणि मला वेगळा न्याय का, असा प्रश्न तिनं विचारला आहे. यावर एका व्यक्तीनं तिला आठवून करुन दिली आहे की, केतकी तू हिंदू धर्माची व्यक्ती आहे तर मोहम्मद जुबेर हा अल्पसंख्यांक समाजातील आहे. त्यामुळे त्याची सुटका हा त्याचा पहिला अधिकार आहे. न्यायनिवाडा हा वेगळा आहे.
हेही वाचा: Ketki Chitale: पोलीस महासंचालकांच्या रिपोर्टवर महिला आयोगाचा आक्षेप!
केतकीच्या त्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केतकी ही तिच्या आक्रमक वक्तव्याबद्दल ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिला यापूर्वी देखील तिच्या बेताल वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी सुनावले असताना अद्याप केतकीला पुन्हा सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा मोह काही केल्या आवरलेला नाही.
हेही वाचा: Liger: विजय देवरकोंडाच्या ७५ फूट उंच कट आऊट्सला दुधाची आंघोळ,Video Viral
Web Title: Ketki Chitale Comments On Mohammad Zubair Case Why Has There Been Selective Justice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..