Rahul Vaidya: क्यूटनेस ओव्हरलोडेड! राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लेकीची पहिली झलक; पाहा व्हिडीओ

Rahul Vaidya And Disha Parmar: राहुल आणि दिशा यांची मुलगी नव्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटो आणि व्हिडीओमधील नव्याच्या क्यूटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Rahul Vaidya: क्यूटनेस ओव्हरलोडेड! राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लेकीची पहिली झलक; पाहा व्हिडीओ

Rahul Vaidya And Disha Parmar: प्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) आणि त्याची पत्नी दिशा परमार (Disha Parmar) यांनी दोहाला जाताना मुंबई विमानतळावर त्यांची मुलगी नव्याचा चेहरा पहिल्यांदा पापाराझीसमोर दाखवला. नव्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या फोटो आणि व्हिडीओमधील नव्याच्या क्यूटनेसनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. नव्या ही राहुलची कार्बन कॉपी आहे, असं नेटकऱ्यांचे मत आहे.

नव्याच्या क्यूटनेसनं वेधलं लक्ष

राहुल वैद्य आणि दिशा परमार हे सप्टेंबर 2023 मध्ये आई-बाबा झाले. राहुल आणि दिशा यांनी त्यांच्या मुलीचं नाव नव्या असं ठेवलं. दिशा आणि राहुल हे सोशल मीडियावर त्यांच्या मुलीचे फोटो शेअर करत होते. पण या फोटोंमध्ये त्यांच्या मुलीचा चेहरा त्यांनी दाखवला नाही. आता दोहाला जाण्यापूर्वी, या जोडप्याने पापाराझींना मुंबई विमानतळावर त्यांच्या मुलीचे व्हिडिओ आणि फोटो क्लिक करण्याची परवानगी दिली.

नव्याचा क्युट लूक

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहुल हा निळ्या रंगाचा ब्लेझर, काळा टी-शर्ट आणि निळा डेनिम अशा लूकमध्ये दिसत आहे तर दिशा काळ्या फुल-स्लीव्ह टी-शर्ट आणि हिरव्या कार्गो पँटमध्ये दिसत आहे. राहुल आणि दिशाची मुलगी नव्या ही पांढऱ्या रंगाचा पोल्का डॉट प्रिंटेड ड्रेस आणि पिंक हेअर बँड अशा क्युट लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या नव्याच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'नव्या राहुलची कार्बन कॉपी आहे'

पाहा व्हिडीओ:

Rahul Vaidya: क्यूटनेस ओव्हरलोडेड! राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लेकीची पहिली झलक; पाहा व्हिडीओ
Rahul Vaidya - Disha Parmar: दोन महिन्यानंतर राहुल - दिशाने केलं मुलीचं बारसं, ठेवलं हे खास नाव

दिशा आणि राहुल यांनी 2021 मध्ये लग्नगाठ बांधली. राहुल हा इंडियन आयडॉल या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच 'बिग बॉस 14' आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी- 11' या शोमध्ये देखील राहुलनं सहभाग घेतला. तसेच 'बडे अच्छे लगते हैं 3' या मालिकेत दिशानं काम केलं. आ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com