priyanka kulkarni

प्रियांका कुलकर्णी मी ई-सकाळ या वेबसाईटमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांमध्ये माझा हातखंडा आहे. चित्रपट, नाटक आणि वेब सीरिज पाहण्याची आणि त्याबद्दल लिहिण्याची आवड आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी मी हुजूरपागा या पुण्यातील शाळेत शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर मी सर परशुराम महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतलं. गरवारे महाविद्यालयात मी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये पदवी घेतली आहे. तसेच गरवारे महाविद्यालयात मी मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स देखील केलं आहे. यादरम्यान मी पत्रकारिता क्षेत्रातील विविध पैलू शिकले. मीडिया क्षेत्रातील अनुभव गेल्या तीन वर्षांपासून मीडिया क्षेत्रात काम करत आहे. या दरम्यान व्हिडीओ आणि लिखाण या दोन्हीही विभागांमधील अनुभव घेतला. सोशल मीडियावरील ट्रेंड्स,वाचकांना आवडणारे विषय आणि लोकांपर्यंत माहिती रंजकपणे पोहोचवणे या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. मी जवळपास आठ-नऊ महिने ई-सकाळ या वेबसाईटमध्ये इंटर्नशिप केली. त्यानंतर मला एबीपी माझा या चॅनलच्या वेबसाईटसाठी काम करण्याची संधी मिळाली. दोन वर्ष एबीपी माझा वेबसाईटच्या मनोरंजन विभागामध्ये काम केल्यानंतर आता मी पुन्हा ई-सकाळ या वेबसाईटमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे. सध्या मी ई-सकाळ या वेबसाईटमधील मनोरंजन क्षेत्रातील बातम्या करत आहे. ई-सकाळ या वेबसाईटमध्ये काम करत असताना पत्रकारिता क्षेत्रातील नैतिक मूल्य सांभाळून बातम्या लवकरात लवकर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मी कटिबद्ध आहे. बातमीची शहानिशा करुनचं मी बातमी लोकांपर्यंत पोहचवते. तसेच विविध सेलिब्रिटींसोबत बोलून ओरिजिनल कंटेन्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करते.
Connect:
priyanka kulkarni
आणखी वाचा