

Mumbai Rain
ESakal
मुंबईत मान्सूनच्या आगमनाबरोबरच दरवर्षी एक ठरलेला प्रसंग पुन्हा घडतो. अंधेरी सबवेपासून ते सायन आणि कुर्ल्यापर्यंत रस्ते पाण्याखाली जातात, वाहने तरंगू लागतात आणि शहराची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेन ठप्प होते. चार महिन्यांनी पाणी ओसरते आणि पुढच्या वर्षी पुन्हा तोच प्रसंग घडतो. २००५ च्या पुरापासून ते २०२६ पर्यंतच्या २१ वर्षांच्या काळात हजारो कोटी रुपये खर्च झाले, असंख्य प्रकल्प उभारले गेले, पण पाऊस आल्यावर मुंबई असहाय्य आणि पाण्याखाली का स्तब्ध उभी राहते?