

National Consumer Agitation: Akhil Bharatiya Grahak Panchayat Mobilizes Jantar Mantar Satyagraha
esakal
मंचर : "ग्राहकांना न्यायसंगत, पारदर्शक आणि वाजवी किंमत मिळावी तसेच विद्यमान एमआरपी (कमाल किरकोळ किंमत) व्यवस्थेतील त्रुटी दूर करून ग्राहकहिताचे नवीन मूल्य निर्धारण धोरण लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शुक्रवार (ता१२ ) रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे राष्ट्रीय स्तरावरील सविनय सत्याग्रह व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे, महाराष्ट्रातून५०० कार्यकर्ते आज नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. "अशी माहिती मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिली.