

Strategic Consolidations: Inside the Secretive Posturing of the Sovereign Command
Sakal
बेटा : (नेहमीच्या विजयी मुद्रेने एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण...मम्मा, आयॅम बॅक!!
मम्मामॅडम : (चटदिशी हातातली कागदपत्रे दडवत) बरं बरं! आलास? छान!!
बेटा : (संशय येऊन) मम्मा, कुछ मुझसे छिपा रही हो? मुझे नहीं बताओगी? मुझे? ऐसी कौनसी चीज है मम्मा, जो एक मां अपने लाडलेसे छिपाती है?
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) जळ्ळं लक्षण! ममताआंटीला मी परवा शेरनी म्हटलं नं, त्यामुळे भावनेनं ओथंबलेलं पत्र पाठवलंय तिनं!
बेटा : (हसून) शेरनी? दे टाळी! मी सुद्धा अभिषेकबाबू बॅनर्जीना वाघिणीचा बछडा म्हटलं!! ते म्हणाले, ‘‘धोन्नोबाद!’’