Crime Sakal
अहिल्यानगर

भंडारदरा धरण परिसरात मद्यधुंद पर्यटकांचा तीघांवर चाकूने हल्ला

सकाळ डिजिटल टीम

अकोले (जि. नगर) : भंडारदरा जलाशय परिसरात संगमनेर व शेंडीतील तरुणांमध्ये धुमश्चक्री होऊन स्थानिक तीन व्यक्तींवर मद्यधुंद पर्यटकांनी चाकुचे वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान राजूर, अकोले पोलिसांनी नाकेबंदी करून यातील एकास अटक केली आहे. तर चार जण फरार आहेत.

नेमके काय घडले?

अगदी शुल्लक कारणावरुन स्थानिक नागरीक आणि या तीन पर्यटाकांमध्ये वाद झाला त्यांना मधे आणि परसय्या यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र या तरुणांनी त्यांचा अतिरेक सुरूच ठेवल्याने नागरीकांनी जसाशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र , या तरुणांनी धारधार चाकु काढला आणि थेट दिसेल त्याच्यावर वार करीत सुटले. हा प्रकार काही क्षणात गावभर पसरला. यावेळी या तरुणांना उपस्थित व्यक्तींनी चांगलाच चोप दिला मात्र, या झडपीत त्यांनी पळ काढला ते गावकऱ्यांच्या हाती लागले नाही. यात गणेश परसय्या ,गोविंद मधे, सुनिल मधे व नवसु मधे या चौघांना बेदम मारहाण करुन त्याच्यावर शस्त्राने हल्ला करण्यात आला आह. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले.

दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी तातडीने एका पथकाची नियुक्ती करून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, दोन्ही बाजू तपासून पाहाव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. भंडारदरा जलाशय परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून उद्यापासून राजूर पोलिस प्रत्येक वाहनाची तपासणी केल्याशिवाय सोडणार नसल्याचे पोलिस अधिकारी नरेंद्र साबळे यांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT