wedding esakal
अहिल्यानगर

अहमदनगर : कन्येने बांधली 60 वर्षीय पित्याची लग्नगाठ!

शांताराम जाधव

बोटा (जि.अहमदनगर) : एक वर्षापूर्वी आईचे निधन झाले. तिचा विवाह (wedding) झाल्याने ती सासरी गेली. त्यामुळे पित्याच्या वाट्याला आलेलं एकटेपण त्रासदायक होऊ लागले. त्यांना आधाराची गरज असल्याचे ओळखून कन्येने स्वतःच्या ६० वर्षीय पित्याचे शुभमंगल करण्याचा निर्णय घेतला आणि अंमलातही आणला. ही सुखद घटना संगमनेर तालुक्याच्या शिंदोडी येथे घडली. शिंदोडीतील ६० वर्षीय पित्याचे नाव आहे. तबाजी चिमाजी कुदनर व त्यांना जीवनाच्या सरत्या काळात साथ देणाऱ्या ४० वर्षीय सहचारिणीचे नाव सुमन तबाजी कुदनर आहे. (60-years-old-Father-wedding-arranged-by-daughter-marathi-news-jpd93)

पित्याच्या वाट्याला आलेलं एकटेपण केले दूर

६० वर्षीय तबाजी चिमाजी कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एक वर्षापूर्वी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंतर मुलीचेही लग्न झाले. त्यामुळे घरात ते एकटेच राहिले. त्यामुळे त्यांच्या खाण्या-पिण्याचे हाल होतं होते. त्यात शेती व जनावरेही संभाळण्याची त्यांची ताकद कमी होत चालली होती. त्यांच्या एकटेपणावर उपाय म्हणून मुलगी सरिता बाचकर व मित्रपरिवाराने त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. सुरूवातीला समाज काय म्हणेल. हे काय लग्नाचे वय आहे आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांमुळे त्यांनी नकारच दिला. मात्र मित्रपरिवार आणि मुलीच्या आग्रहाखातर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आणि राहुरी तालुक्यातील शिंगवे गावातील ४० वर्षीय सुमनबाईंसोबत केवळ आठ ते दहा वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत विधिवत लग्न केले.

सुमनबाई यांनीही आपल्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार व माझ्या स्वखुशीने हे लग्न करत असल्याचे सांगितले. मी या लग्नापासून आनंदित आहे, असंही सुमनबाई म्हणाल्या. आयुष्याच्या अशा टप्प्यावर पुन्हा या दोघांना जोडीदार मिळाल्याने दोघेही आनंदाने जीवनाची दुसरी इनिंग सुरू केली आहे. या शुभकार्यासाठी अशोक बाचकर, भीमराव कुदनर, सहादू गायकवाड, बबन गायकवाड यांनी पुढाकार घेतला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT