fraud esakal
अहिल्यानगर

डॉक्‍टरांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर वटवले 74 हजार

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : डॉक्‍टरांच्या क्रेडिट कार्डमधून परस्पर 74 हजार 250 रुपये काढण्यात आले. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक आणि माहिती- तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Fraud)

एकामागे एक मेसेज आले अन् पैसे गायब झाले

शेवगाव येथील डॉ. मयूर सोनाजी लांडे (वय 34, रा. लांडेगल्ली, शेवगाव) हे ता. 28 डिसेंबर 2021 रोजी वैजापूर येथून भाऊ मनोज यांच्यासमवेत रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास शेवगावकडे कारने येत होते. डॉ. लांडे यांच्याकडे भारतीय स्टेट बॅंकेचे (SBI) क्रेडिट कार्ड होते. या कार्डमधून 14 हजार 850 रुपये कपात झाल्याचा त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यानंतर सलग अशा स्वरुपाचे पाच मेसेज येऊन खात्यातून 74 हजार 250 रुपये कपात झाले. त्यांनी या मेसेजचे मोबाईलवर स्क्रीनशॉट काढून घेतले. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

बॅंकेच्या ग्राहक सेवा केंद्राशी क्रेडिट कार्डमधून पैसे कपात झाल्याची तक्रार केली होती. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर पोलिसांनी फसवणूक आणि माहिती- तंत्रज्ञान कायदा 66 (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले आणि उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश गोसावी पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात गणेशोत्सवात ५ दिवस 'ड्राय डे'; कोणत्या भागात मद्यविक्री कधी बंद? जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

Petrol-Diesel-CNG Price Today: कच्चे तेल 100 डॉलरवर! मुंबई-नागपूर-पुणेसह महाराष्ट्रात आता पेट्रोल-डिझेल कितीला?

ब्रिटनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे एअर ट्राफिक, हजारो उड्डाणे रद्द; जगभरातील विमानसेवेला फटका, विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

Premnagarcha Maharaja: मुंबईत आगमनसोहळ्यात मोठी दुर्घटना, तातडीने गणेशमूर्तीचं विसर्जन, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : सतीश जारकीहोळी यांच्या घरावर ईडीची छापेमारी

SCROLL FOR NEXT