Mushrif_Panday 
अहिल्यानगर

नगर अग्नितांडव : निष्काळजीपणासाठी अज्ञातांवर गुन्हा दाखल!

नाशिकच्या पोलीस आयुक्तांची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयूला लागलेल्या भीषण आग प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर याप्रकरणाची चौकशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितलं.

आयुक्त पांडे म्हणाले, "निष्काळजीपणामुळं मृत्यूप्रकरणी अज्ञातांवरोधात भादंवि कलम ३०४ अ अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस निरिक्षक किंवा पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाच्या चौकशी केली जाईल."

अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राज्य सरकारकडून या अग्निकांडप्रकरणाच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही अतिशय दुर्देवी घटना असून सरकारनं वारंवार रुग्णालयांना फायर ऑडिट करण्याच्या सूचना देऊनही अशा घटना घडतात हे दुर्देवी आहे.

दरम्यान, अहमदनगर शहरातील सिव्हिल हॉस्पिटलला लागलेल्या भीषण आगीत आयसीयूतील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. हे सर्वजण कोविडचे उपचार घेत असलेले रुग्ण होते. तर अनेक जण यात जखमी झाले आहेत. राज्य शासनानं यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik TCS Case: नशिला 'शीर खुर्मा' ते फेस स्कॅन... नाशिक धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासे

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २५ एप्रिल २०२६ ते १ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

Mohol News : शेत मालकीनीनेच केला दरोड्याचा बनाव; पोलिसांच्या चौकशीत सत्य उघड, मोहोळ तालुक्यातील प्रकार

Chardham Yatra 2026 : केदारनाथला जायचंय? फक्त ७२ मिनिटांत ३१ हजार तिकीटं बुक; बुकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल, युपी दुसऱ्या क्रमांकावर!

Marathi Mandatory: ऑटो-टॅक्सी चालकांना मराठी शिकवणार; पण जबरदस्ती करणार नाही, भाषा नियमावर देवेंद्र फडणविसांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT