Crime News sakal
अहिल्यानगर

Crime News : गोळीबारप्रकरणी आरोपीस पोलिस कोठडी

जखमीची पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घेतली भेट आरोपीने बुधवारी माणिक सुखदेव केदार यांच्यावर कौटुंबिक कारणातून गोळीबार केला होता. त्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी : कौटुंबिक वादातून गोळीबार करणाऱ्या हत्राळ सैदापूर येथील घटनेतील आरोपी सुभाष विष्णू बडे याला आज न्यायालयासमोर उभे केले असता, त्याला १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर येथे जखमीची भेट घेतली.

आरोपीने बुधवारी माणिक सुखदेव केदार यांच्यावर कौटुंबिक कारणातून गोळीबार केला होता. त्यात ते जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जखमी केदार यांचा मुलगा किरण केदार याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बडे याच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

किरण केदार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी सध्या स्पर्धा परीक्षा देत असून, माझी पत्नी सोनाली हिचा मागील वर्षी आरोपी बडे याच्याशी रितसर घटस्फोट झाला आहे. काल बुधवारी रात्री बडे हा आमच्या घरी आला व त्याने सोनाली हिला ‘मी तुला एवढे जपत असतानाही तू दुसरे लग्न का केले,’ असे म्हणत मारहाण केली.

या वेळी त्याच्या हातात पिस्तूल होते. वडील माणिक केदार हे बडे याला समजावून सांगत असताना त्याने पिस्तुलातून त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या घटनेनंतर घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी बडे याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज बडे याला गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर यांनी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती कळताच काल रात्री अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे व पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेतील जखमी केदार यांची नगर येथील रुग्णालयात जाऊन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT