Ahemadnagar Fire Team eSakal
अहिल्यानगर

अहमदनगर: फायर ऑडिटला गांभीर्यानं घेतलं असतं तर...

अहमदनगरच्या रुग्णालयात आग लागलेल्या इमारतीच्या फायर ऑडिटमधून त्रुटी समोर आल्या आहे.

सुधीर काकडे

अहमदनगरमध्ये जिल्हा रुग्णालयात आग (Ahemadnagar Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली. रुग्णालयाच्या कोविड विभागातील आयसीयुमध्ये उपचार घेत असलेल्या ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनं आज अहमदनगर जिल्ह्यात शोककळा पसरली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली असून, या आयसीयु विभागाचे फायर ऑडिट झालेले होते. या ऑडिटमध्ये काही त्रुटी देखील समोर आल्या होत्या.

रुग्णालयाच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली, त्या इमारतीचं ऑडिट झालेलं होतं. महापालिकेतील अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ यांनी फायर ऑडिट केल्यानंतर त्यावेळी या ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटीही शल्यचिकित्सकांना कळविण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी दिलेल्या सुचनांनुसार अंमलबजावणी कारवाई झाली नाही, आणि परिणामी आज या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडल्यानंतर ११ रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला.

फायर ऑडिटमधून समोर आलेल्या त्रुटी

  • इमारतीमध्ये फायर आलार्म नव्हते.

  • आग लागल्यानंतर ती विझवण्यासाठी काम करणारे स्प्रिंकलर नव्हते.

  • इमारतीमध्ये पाण्याचे पंप नव्हते.

  • आग लागल्याचा आलार्म देणारे सेंसर नव्हते.

रुग्णालयाच्या या आयसीयु विभागात मोठ्या प्रमाणात तारांचा संच होता. त्यातट शॉर्टसर्किट होऊन होऊन ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते आहेय त्यामुळे जर फायर ऑडिटमध्ये दिलेल्या सुचनांचं पालन केलं असतं तर कदाचित आज ११ रुग्णांना नाहक आपले प्राण गमवावे लागले नसते अशा भावना मृतांच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केल्या जाता आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का! अन्नामलाईंनंतर आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ, 'या' पक्षात करणार प्रवेश...

Mumbai Traffic: मुंबईकरांसाठी मोठा बदल! BKC मध्ये कार आणि बाईकला दर शुक्रवारी प्रवेशबंदी; कठोर नियमाचं कारण काय?

Pune Crime: बिबवेवाडीत डिलिव्हरी बॉयला धमकावून मारहाण; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, दोघे अटकेत

IND vs AFG, ODI : रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? त्या Viral Video मुळे मिळालं स्पष्ट उत्तर

Pachod Crime : अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या आठ चालक मालकाविरुद्ध गुन्हा; वाळूसह सव्वा तेहतीस लाखाचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT