ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : दरोड्याचा बनाव; पत्नीकडून पतीचा खून

ज्या कपाटातून सात लाख रुपये गेल्याचे सांगितले, त्यावर नईमचे पाकिट होते.

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर - गेल्या पाच ते सात वर्षांपासून पतीकडून सुरू असलेल्या छळाला कंटाळून पत्नीनेच साडीने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिने दरोडा पडल्याचा बनाव केला. हा सर्व प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे.

बुशरा नईम पठाण (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणाची माहिती देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपाधीक्षक डाॅ. बसवराज शिवपुजे, निरीक्षक हर्षवर्धन गवळी आदी उपस्थित होते.

गुरूवारी (ता.२१) रात्री दोन वाजेच्या सुमारास बेलापूर येथील बॅटरी व्यावसायिक नईम रशीद पठाण (वय ४०) यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेतानाच नईमचा गळा आवळून खून केला. तसेच आपल्यालाही जबर मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांमध्ये चार पुरुषांबरोबर एका महिलेचाही समावेश होता, असा बनाव सुरुवातीला पत्नी बुशरा हिच्याकडून करण्यात आल्याने त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.यावेळी तिने सांगितलेली घटना सुसंगत वाटत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. दरोडेखोर मागच्या बाजूने घरात आले. आजूबाजूला शेती व रात्री पाऊस झालेला असताना घरात सर्वत्र स्वच्छता होती. त्यामुळे कोणी घरात आल्याचे चिन्ह दिसत नव्हते. शिवाय इतक्या रात्री बुशराने बंगल्याचा दरवाजा का उघडला. नईमचा मृतदेह बेडवर होता,

तेथे झटापट झाल्याची दिसत नव्हते. ज्या कपाटातून सात लाख रुपये गेल्याचे सांगितले, त्यावर नईमचे पाकिट होते. त्यामध्ये असलेली ४० हजाराची रक्कम चोरीस का गेली नाही, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उपस्थित झाले होते.

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नातेवाईकांची चौकशी केली. बुशरा हिने चौकशीदरम्यान दरोड्याचा बनाव करून आपणच खून केल्याची कबुली दिल्याने तिला अटक करण्यात आली.

आपले मनाविरुद्ध लग्न झाले होते. तसेच पती नईम हा गेली पाच ते सात वर्षांपासून छळ करत होता. या कंटाळून आपण त्याला दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर खिडकीला साडीचे एक टोक बांधून साडीच्या साह्याने त्याचा गळा आवळून दुसरे टोक हाताने ओढून त्याचा खून केल्याची तिने कबुली दिली. घटना घडली, त्यावेळी दोन मुले व ११ वर्षांची भाची घरात होते. ते ज्या खोलीत झोपलेले होते, तिला बाहेरून कडी लावली. आई आजारी असल्याने तिला झोपेच्या गोळ्या सुरू होत्या, माहेरी गेल्यानंतर त्यातून गोळ्या घेऊन येत असल्याचे तिने चौकशीदरम्यान सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT