Crime News esakal
अहिल्यानगर

Ahmednagar crime : लेडी गँगची काष्टीत दहशत

मध्यरात्री फिरणाऱ्या अज्ञात मुली सीसीटीव्हीत कैद

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : काष्टीत चोरांचा कायमच सुळसुळाट असतो. गावात असणारी मोठ्या बाजार व व्यापारी पेठेवर चोरांचे लक्ष असते. मात्र, दोन दिवसांत गावात मध्यरात्रीनंतर फिरणाऱ्या, चेहरे झाकलेल्या लेडी गँगने चांगलीच दहशत माजवली आहे. सीसीटीव्हीत या मुली कैद झाल्या.

या मुली नेमक्या कोण, एवढ्या बिनधास्त कशा फिरतात आणि त्यांची देहबोली धाडसी असल्याने गावात दहशत आहे. पोलिसांनी त्या मुली नेमक्या कोण आहेत याचा शोध सुरू केला आहे. काष्टीतील गुन्हेगारी कायमच चर्चेत राहिली आहे. तेथील जनावरांचा आठवडे बाजार राज्यात प्रसिद्ध आहे.

त्यातच गेल्या काही वर्षांत काष्टीचे व्यापारी महत्त्व व अर्थकारण चांगलेच वाढले आहे. पर्यायाने गुन्हेगारीही वाढली आहे. भुरट्या चोऱ्यांकडे दुर्लक्ष झाले तरी आता तेथे दिसलेली नवीन टोळी सगळ्यांची झोप उडवीत आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री दोन वाजून दहा मिनिटांनी काष्टीतील एका गल्लीतून पाच मुली बिनधास्तपणे जाताना दिसल्या.

या मुलींचा पेहराव सामान्य असला तरी त्यांनी चेहरे झाकले होते. मात्र, त्यांची देहबोली खूपच बिनधास्त वाटत असल्याने काष्टीकरांची चर्चा सुरू झाली आहे. या मुली सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. त्यात त्या कुठल्या तरी मोहिमेवर निघाल्याचे दिसत आहे. त्या रात्री गावातील काही लोकांनी पोलिसांना लगेच माहिती दिली. पोलिसांचे गस्तीपथकही गावात आले, मात्र त्या मुली तोपर्यंत गायब झाल्या होत्या.

काष्टीतील काही लोकांशी याबाबत चर्चा केल्यावर समजले, की एवढ्या रात्री एकत्र मुली अशा पद्धतीने कशा फिरू शकतात? पहाटे फिरण्यासाठी जात असतील तर रात्री सव्वादोनची वेळ म्हणजे खूपच लवकर होते. शिवाय, मुली असल्याने त्या एवढ्या रात्री फिरण्यासाठी बाहेर पडणार नाहीत. या सगळ्या दहशतीत आता पोलिसांनी लक्ष घातले असून, हा नेमका काय प्रकार आहे, याची चौकशी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT