Murder esakal
अहिल्यानगर

Ahmednagar Crime : धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाचा खून

वाळकी येथील घटना चौघांविरुद्ध गुन्हा; एकास अटक

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणातून तरुणाला मारहाण करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना वाळकी (ता. नगर) शिवारात गुरुवारी (ता. २३) रात्री घडली. आप्पासाहेब लांडगे (रा. बाबुर्डी घुमट, ता. नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी अलका लांडगे यांनी शुक्रवारी (ता. २२) रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण पिराजी बोठे, प्रवीण ऊर्फ पंकज अरुण बोठे, मनोज राधाकिसन भालसिंग व इंदूबाई अरुण बोठे (सर्व रा. वाळकी, ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. गुन्हा दाखल होताच नगर तालुका पोलिसांनी प्रवीण ऊर्फ पंकज अरुण बोठे याला ताब्यात घेतले आहे.

आप्पासाहेब लांडगे हे वाळकी येथील कापड दुकानात काम करत होते. ते गुरुवारी सकाळी कामावर गेले होते. सायंकाळी कामावरून घरी येत असताना वाळकी येथील शाळेजवळ त्यांच्याकडून बोठे कुटुंबातील नातेवाईकाला वाहनाचा धक्का लागला. याच कारणातून आप्पासाहेब यांना मारहाण करण्यात आली.

दरम्यान, आपला पती कामावरून अजून घरी आला नाही म्हणून फिर्यादीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला असता, आप्पासाहेब यांना मारहाण होत असल्याचे समजताच फिर्यादींनी पुतण्याला घटनास्थळी पाठविले. तेव्हा आप्पासाहेब याचा अपघात झाला असल्याने तो बेशुद्ध झाला असल्याचे तेथील लोकांनी सांगितले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांनी अधिक माहिती घेतली असता, वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून चौघांनी आप्पासाहेब यांना मारहाण केल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रणजित मारग करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT