फसवणूक! Sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : कुक्कुटपालनात ५४ लाखांची फसवणूक

एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: अलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीच्या ५४ लाखांच्या फसवणूकप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. महेश बबन भोर (वय ३५, रा. निमगाव वाघा, ता. नगर) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलिस अंमलदार योगेश ठाणगे, विक्रांत भालसिंग, राजू खेडकर यांच्या पथकाने आरोपी भोर याला इस्लामपूर (जि. सांगली) येथून अटक केली. शेतकऱ्यांनी कुक्कुटपालनसाठी कंपनीकडून आणलेल्या सुमारे साडेसोळा हजार पिलांची, कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून परस्पर विक्री केली.

करारनाम्याच्या मूळ प्रतींची चोरी केल्याच्या या प्रकरणात, अलिबाग येथील प्रिमियम चीक फिड्‌स कंपनीची ५४ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात पोल्ट्रीचालक व कंपनीतील कर्मचारी अशा १० जणांविरोधात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT