Ahemadnagar Fire Team eSakal
अहिल्यानगर

"आईला वाचवलं पण माझ्या डोळ्यासमोर वडिलांनी जीव सोडला..."

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत विविकने आपल्या वडिलांना गमावलं आहे.

गोरक्षनाथ बांदल

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात आज सकाळी आग लागली. (Ahemadnagar Fire) रुग्णालयाच्या कोविड विभागातील आयसीयुमध्ये लागलेल्या या आगीत काही मिनिटांत 11 रुग्णांचा मृत्यू झाला. आगीचं स्वरूप भीषण असल्यानं रुग्णांना बाहेर काढेपर्यंतच या अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेत काही लोकांनी डोळ्यासमोर आपल्या उपचार घेत असलेल्या नातलगांना गमावलं. यातील कडूबाळ गंगाधर खाटीक यांचा डोळ्या समोर मृत्यू झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विवेक खाटीकने दिली.

जिल्हा रुग्णालयात लागलेल्या या आगीच्या घटनेचा विवेक प्रत्यक्ष साक्षीदार आहे. आपल्या वडिलांचा या आगीत मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना त्यांनं स्वत: सांगितली. "मागच्या गुरूवारी वडिलांना कोविडच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती केलं होतं. वडिलांच्या सोबत मी आणि माझी आई सुद्धा इथेच होतो. आज सकाळी ही घटना घडली त्यावेळी मी रुग्णालयाच्या बाहेर आलेलो होतो. आगीची घटना कळताच मी धावत मध्ये गेलो. वडीलांना आयसीयु बेडवर ठेवलं असल्यानं मला त्यांना लगेच उचलता आलं नाही. म्हणून मी आधी आईला बाहेर घेऊन आलो. आग दिसत असल्यानं मी येताना माझा शर्ट काढून वडिलांच्या अंगावर टाकला. आईला बाहेर सोडून आलो तेव्हा डोळ्यासमोर जे होतं ते मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यापासून १०-१५ वडिल त्या आगीमध्ये भाजले जात होते. आग मोठी असल्यानं भरपूर धुर झाला होता, त्यामुळं मला काहीच करता आलं नाही. माझ्यासमोर सगळं होत्याचं नव्हतं झालं" अशी भावना यावेळी विवेकनं व्यक्त केली. पुढे त्यानं पुन्हा एकदा बोलून दाखवलं की, मी आईला वाचवलं पण वडिलांना वाचवता आलं नाही याची आयुष्यात खंत राहील.

जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या या आगीमध्ये ज्या 11 रुणांचा मृत्यू झाला, त्या सर्वांच्या अशाच हृदयद्रावक कहाण्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची दखल घेत प्रत्येकी 7 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णालयात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे देखील गांभीर्यानं पाहिलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT