nagpur sakal
अहिल्यानगर

Ahmednagar News : दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत - बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात संगमनेर दूध संघाची वार्षिक सभा

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर - आगामी काळात कमी गायांमध्ये गुणवत्तापूर्ण जास्त दूध उत्पादन करून सहकारी संघाचे दूध संकलन वाढवले पाहिजे. राजहंस दूध संघाने कायम चांगला भाव दिल्यामुळे मागील वर्षात शेतकरी दुग्ध उत्पादकांच्या हातात सुमारे ४०० कोटी रुपये आले. दूध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होऊन रोजगार निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष रणजितसिंह देशमुख होते.ते म्हणाले, दूध व्यवसायाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असून सहकारी दूध संघाची यावर्षीची ५३० कोटी रुपयांची उलाढाल झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यात ४०० कोटी रुपये आले आहेत.

राजहंसने दुधाला उच्चांकी भाव देण्याबरोबरच उत्पादन वाढीसाठी विविध योजना राबवल्या आहेत. कोरोना काळात रणजितसिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सरकारने दररोज दहा लाख लिटरची दूध पावडर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकही दिवस बंद राहिला नाही.

रणजितसिंह देशमुख म्हणाले, दूध उत्पादकांना कमी दरात औषधे तसेच सॉर्टेड सिमेन या योजनेमुळे ९५ टक्के उच्चप्रतिच्या कालवडी निर्माण होत आहेत. देशात प्रथमच स्मार्ट कार्ड योजना राबविण्यात आली आहे. दूध संघात दीड मेगावॉट सोलर निर्मिती प्रकल्प तसेच गावोगावी बायोगॅस प्लांट योजना राबवली जाणार आहे. या वेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात, बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, राजेंद्र चकोर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदी उपस्थित होते.

ऊस व दूध हे शाश्वत व्यवसाय आहेत. राज्यात राज्यामध्ये दीड कोटी कुटुंबे तर देशात आठ कोटी कुटुंबे दूध व्यवसायात आहेत. सरकारने साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला तातडीने मदत करुन, सहकार्य करा.

रणजितसिंह देशमुख, अध्यक्ष, राजहंस दूध संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''वृक्षतोडीबाबत ‘फेक नॅरेटिव्ह’ पसवण्याचा प्रयत्न'', CM फडणवीसांनी सांगितलं कर्जतमधील टोरेंट प्रकल्पाचं महत्त्वं, काय म्हणाले?

'मला साडीत बघून माझ्या सासूने ओळखलंच नाही'; सचिन पिळगांवकरांनी माधुरी दीक्षितला सांगितला 'अशी ही बनवाबनवी'चा किस्सा, म्हणाले...

Beed FDA Action: दिवाळीपूर्वी बीडमध्ये FDA चे छापे; पाबळे नमकीन आणि मामा काठियावाडीचे परवाने निलंबित

‘एका तासात इस्रायलला राहण्यायोग्य ठेवणार नाही’; इराणचा नेतान्याहूंना थेट इशारा, थेट नकाशाच शेअर केला...

Pune MPSC News: एमपीएससी चौकशी आयोगाची अद्याप एकही बैठक नाही; उर्वरित ४५ दिवसांत तपास कसा पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT