Ahmednagar 
अहिल्यानगर

Ahmednagar : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर 'शिवशाही'ने घेतला पेट; चालकाने...

सकाळ वृत्तसेवा

घारगाव : दुपारी सव्वाबाराची वेळ... अचानक शिवशाही बसमधून धूर निघतो. त्यामुळे चालक लगेच प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला उभी करतो आणि घाबरलेले सर्व प्रवासी पटापट उतरतात... हा सर्व प्रसंग संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथील मुळा नदीच्या कडेला पाहावयास मिळाला.

शनिवारी (ता. २०) पिंपरी-चिंचवड आगाराची शिवशाही बस (एमएच ०६, बीडब्ल्यू ०६४९) चालक आकाश अरविंद गायकवाड हे ४५ प्रवासी घेऊन नाशिककडे जात होती. आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव परिसरात आल्यावर बसच्या एसी कॉम्प्रेसरमधून अचानक धूर निघाला. त्यामुळे सर्व प्रवासी घाबरून गेले आणि काही सेकंदांतच संपूर्ण बसमध्ये धूर झाला.

त्यामुळे चालक गायकवाड यांनी प्रसंगावधान राखत बस महामार्गाच्या कडेला घेतली. त्यानंतर सर्व प्रवासी घाबरून पटापट उतरले. बसने पेट घेतला की काय अशी भीती वाटू लागली होती. चालक आकाश गायकवाड यांनी दुसरी बस थांबवून प्रवाशांना बसवून दिले. यापूर्वीही पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा ही घटना घडल्याने विविध समस्यांमुळे शिवशाही बस पुन्हा चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal : विद्यार्थ्याच्या कपाळावरील टिळा काढल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात FIR; मुख्यमंत्र्यांचे कडक निर्देश

OBC Reservation Latest Update : ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर मैदानात उतरून लढू; मंत्री छगन भुजबळ यांचा सरकारला थेट इशारा

MONEY LUCK: सप्टेंबरमध्ये पैशांची कमतरता भासणार नाही! ‘या’ राशींवर होणार धनाचा वर्षाव; तिजोरी भरभरून भरणार, तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates: दहीहंडी उत्सवामुळे मंडई मेट्रो स्थानकाच्या प्रवेश आणि निर्गमन मार्गात तात्पुरता बदल

IND vs PAK: आज पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने; स्मृती मानधनाचा फॉर्म निर्णायक ठरणार, हरमनप्रीत कौरकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा

SCROLL FOR NEXT